पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी प्रेम्लोक पार्क परिसरात जवळ असलेल्या एका नाल्यांमध्ये सैन्य दलात वापरण्यात येणाऱ्या बॉम्बसदृश्य काही वस्तूंचे अवशेष आढळून आले आहेत. हे बॉम्ब सदृश्य अवशेष बॉम्बशोधक पथकाकडून ताब्यात घेण्यात आले असून याची तपासणी सुरु केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी प्रेम्लोक पार्क परिसरात जवळ असलेल्या नाल्याच्या परिसरात असलेल्या एका पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम महापालिकेकडून सुरु होते. हे काम सुरु केल्यानंतर खोदकाम चालू असताना यामध्ये बॉम्बसदृश्य तीन वस्तू सापडल्या. पाईप लाईन दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठाना दिली. यानंतर महापालिकेचे पथक येथे दाखल झाले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयापासून काही अंतरावरच हा सर्व प्रकार समोर आला आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे बॉम्बशोधनाशक पथक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले असून या बॉम्बसदृश्य सापडलेल्या वस्तूंच्या तपासणीचे काम ते करत आहेत.