( Pune PMC News ) पुणे : उरूळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांना पुणे महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा निर्ण राज्य शासनाचा निर्णय झालाच नाही. तसेच महानगरपालिकेच्या ( Pune PMC News )अंदाज पत्रात या गावांसाठी निधीची तरतूदच केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या गावांना वाली कोण असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
ही दोन गावे वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने या गावांतील विकासकामे व सुविधा बंद केल्या असून अद्याप गावे वगळण्याची व स्वतंत्र नगरपालिका करण्याची प्रक्रिया न झाल्याने स्थानीक ग्रामस्थांना पुढे मोठे प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
राजकिय पुढारी मात्र जाणीवपूर्वक मिठाची गुळणी धरून बसल्याचा आरोप…
गावे वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर महापालिकेचे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार होत आहे. या अंदाजपत्रकामध्ये या दोन्ही गावांसाठी निधी देण्यात आलेला नाही, अशी माहिती प्रशासनातील अधिकार्यांनी दिली आहे. तसेच राज्य सरकारनेही या गावांतील विकासकामांसाठी फारशी भरीव तरतूद केलेली नाही. त्यामुळे या गावांना येत्या काळात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. गावे वगळण्याचा निर्णय घेणारे राजकिय पुढारी याबाबत मात्र जाणीवपूर्वक मिठाची गुळणी धरून बसल्याचा आरोप स्थानीक ग्रामस्थ करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
पुणे महापालिकेचा अजब कारभार ; चोर सोडून संन्याशाला शिक्षा!,