( Pune News ) पुणे : पुण्यातील रिक्षांचे ई-रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी महानगरपालिका २५ हजार रूपयांचे अनुदान देणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन…
शहरात ( Pune News ) इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेकडून मोहीम राबण्यात येत आहे. त्याअंतर्गत हे अनुदान देण्यात येणार आहे.
रिक्षाचे ई-रिक्षामध्ये रूपांर करण्यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यातील २५ हजार रूपये हे पुणे महानगरपालिकेकडून देण्यात येणार आहेत. उर्वरित ६० टक्के रक्कम वाहन मालकाला खर्च करावी लागणार आहे. याशिवाय, पालिका या ई-रिक्षांच्या चार्जिंगसाठी शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन देखील उभारणार आहे.
पुणे शहरात पेट्रोल, डिझेलमुळे प्रदूषण वाढताना दिसत आहे. शिवाय इंधनाचे दर देखील आवाक्याबाहेर गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार पुण्यात देखील हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महापालिकेकडून २५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्यामुळे रिक्षा चालकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
दरम्यान, यापूर्वी शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून तीन चाकी ऑटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी प्रत्येकी बारा हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यानंतर आता रिक्षाचे ई-रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime : पुण्यात भल्या सकाळी चोरट्यांनी ज्येष्ठाला लुटत पळविला रिक्षा ; चोरट्यांचा शोध सुरू..!
Pune News : अखेर रिक्षा चालकांची मागणी झाली पूर्ण ; महामंडळाची घोषणा