Pune News| पिंपरी-चिंचवड : वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीमुळे उघड्या डीपीला हात लागल्याने आठ वर्षीय मुलगी भाजल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड शहातील पिंपळे सौदागर येथून समोर आला आहे. महावितरणच्या हलगर्जीमुळे हा प्रकार घडला आहे. यामध्ये मुलगी गंभीर भाजली आहे.
याप्रकरणी आनंद विजयकुमार उमर्जीकर (वय 32, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी पिंपळे सौदागर येथील जगताप कॉलनी येथे मैत्रिणीसोबत खेळत होती. दरम्यान खेळता-खेळता मुलगी तेथील सार्वजनिक शौचालयाजवळ असलेल्या इलेक्ट्रिक डीपीच्या कंपाउंड मध्ये गेली. त्यावेळी तिचा हात उघड्या डीपीला लागला. यामुळे मुलगी गंभीररीत्या भाजली.
महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डीपीला तार कंपाउंड न केल्याने तसेच डीपी व्यवस्थित बंद न केल्याने हा अपघात घडला. या घटनेनंतर महावितरणाच्या संबधीत कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News : मुंढव्यात पबमध्ये प्रवेश नाकारल्याच्या रागातून वेटरवर धारदार शस्त्राने वार
Pune News : मोदी सरकार म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल; काँग्रेसच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका
Pimpri News : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या कचराकुंडीत सापडले अर्भक