Pune News : पुणे : शहरात मुलाने नवे घर घेतले. घर पाहण्यासाठी गावाकडून वृद्ध आई पुण्यात आली. येथे आल्यानंतर घडले मात्र भलतेच. किरकोळ अपमानाचा बदला घेण्यासाठी वृद्धेच्या डोक्यात स्टीलचा बत्ता घालून आणि त्यानंतर चाकूने सपासप वार करून निघृण खून करण्यात आला. तळवडे येथील जिजाऊ हाउसिंग सोसायटीमध्ये ही घडली होती. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
अल्पवयीन मुलाने केली हत्या
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा जगन्नाथ आमटे (वय ६८, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. बेरडवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. (Pune News) या प्रकरणी मुलगा पोपट जगन्नाथ आमटे (वय ३८, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोपट आमटे यांच्या आई बीड जिल्ह्यातून मुलाचे नवीन घर पाहण्यासाठी रुपीनगर, तळवडे येथे आल्या होत्या. प्रवासाची दगदग झाल्याने त्या आजारी पडल्या. (Pune News) त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान, सहा जुलै रोजी सकाळी मुलगा पोपट कामासाठी बाहेर गेला होता. त्या वेळी आई शोभा घरात एकटीच होती. सकाळी सव्वाअकरा ते पावणेबाराच्या सुमारास अज्ञातांनी घरात येऊन शोभा यांच्या डोक्यात स्टीलचा बत्ता घातला. त्यानंतर चाकूने सपासप वार करून त्यांचा खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी पोपट यांच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. (Pune News) त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट एककडून करण्यात येत आहे.
आरोपीचे वडील आणि पोपट आमटे मित्र आहेत. दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. (Pune News) काही किरकोळ कारणावरून एकदा त्याला पोपट यांच्या आईने धक्काबुक्की करून घराबाहेर काढले होते. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने शोभा या घरात एकट्या असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी बत्ता मारून त्यांचा खून केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हिमाचलमध्ये पावसाच्या तडाख्यात सापडलेले १७ पुणेकर सुरक्षित
Pune News : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; खडकवासला येथील घटना