Pune | पुणे : बाजारपेठेतून साहित्य नेण्यासाठी कापडी पिशव्या महाग मिळत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जातो. यामुळे प्रदूषण वाढून पर्यावरणावर गंभीर परिणाम होता. यावर महापालिका आता बाजारपेठा तसेच गर्दीच्या ठिकाणी कापडी पिशव्यांचे एटीएम बसवत आहे. “सीएसआर’अंतर्गत या मशिन बसविण्यात बसविण्यात येत आहेत.
या “एटीएम’साठी पिशव्या पुरविण्याचे काम महापालिका बचतगटांना देणार आहे. तुळशीबाग, रेल्वेस्थानक, बस स्थानके, महात्मा फुले मंडई, मार्केट यार्ड तसेच साहित्य खरेदीसाठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत असले. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी दिली. एस.एस इंजिनिअर्स या संस्थेकडून या मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
असे आहे ‘एटीएम’….
हे मशिन स्वयंचलित असेल. त्यात एका वेळी १०० ते १५० कापडी पिशव्या ठेवण्याची क्षमता असून अवघ्या ६५ किलो वजनाची ही मशिन आहे. या मशिनमध्ये दहा रुपये, पाच रुपयांचे कॉइन वापरून नागरिक लहान आणि मोठ्या कापडी पिशव्या खरेदी करू शकणार आहे. हे मशिन २४ तास सुरू ठेवता येते.
सार्वजनिक ठिकाणे, मॉल, बाजारपेठा, हॉटेल, विमानतळ, रेल्वे स्थानक, एसटी स्थानकाच्या ठिकाणी सहज ठेवता येणारे हे मशिन आहे. नागरिक आपल्या आवश्यकतेनुसार या मशिनमधून लहान अथवा मोठी कापडी पिशवी खरेदी करू शकणार आहेत.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत म्हणाल्या, “नागरिक अनेकदा बाजारात स्वत:ची पिशवी नेत नाहीत. तर, दुकानांत कापडी पिशवी महाग असल्याने स्वस्त असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करतात.
काही ठराविक जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांना मान्यता असली, तरी त्या पर्यावरणासाठी घातक असतात. त्यामुळे कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशिन शहरात आठ ठिकाणी बसविले जाणार आहेत. तसेच 1 मेपासून या उपक्रमाची सुरूवात केली जाणार आहे.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!