पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भाडेकरू कुटुंबातील १८ वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर घरमालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काळेवाडी परिसरात २१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याप्रकरणी १८ वर्षीय पीडित तरुणीच्या ४८ वर्षीय आईने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ६५ वर्षीय घरमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, घरमालकाच्या जागेत असलेल्या त्यांच्या रूमवर फिर्यादी यांचे कुटुंब भाड्याने राहत आहे. फिर्यादी यांच्या १८ वर्षीय मुलीचा वयानुसार बौद्धिक विकास झाला नसल्याने ती मानसिक दृष्ट्या कमकुवत आहे. याचा गैरफायदा घेत घरमालकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.