(Politics News) पुणे : कसबा पोट निवडणुक आता संपली आहे. त्यामुळे राजकारणाचं (Politics News) युद्ध संपले आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आता समाजकारणाच्या युध्दाला सामोरे जाणार आहे. या युध्दामध्ये भाजपचे हेमंत रासने (Hemant)यांच्या हातात हात घालून काम करणार आहे. असे आश्वास नवनिर्वाचित आमदार (MLA)रवींद्र धंगेकरांनी कसब्यातील जनतेला दिले.
शिवजयंती (Shivjayanti) निमित्ताने कसबा विधानसभा मतदार संघात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका कार्यक्रमाचे आयोजक पुष्कर तुळजापूरकर यांनी धंगेकर आणि रासने यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी धंगेकर बोलत होते.
दरम्यान, निवडणुकी झाल्यानंतर हे दोन्ही नेते एकत्र कार्यक्रमास उपस्थिती लावणार असल्याने नागरिकांची उत्सुकता वाढली होती. मात्र धंगेरकर उशीरा आल्याने नागरिकांचा हिरमुड झाला.
धंगेकर म्हणाले की, ”छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच कसबा परिसरात असलेल्या लाल महाल या ठिकाणावरून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ मेढ रोवण्यास सुरुवात झाली.तसेच मी याच भागात लहानाचा मोठा झालो असून स्वतःला भाग्यवान समजतो.आजपर्यंत शिवजयंतीमधील मिरवणुकीची वारी माझ्या हातून कधीच चुकली नसल्याचे त्यांनी सांगितले.”
हेमंत रासने यांच्या हातात हात घालून काम करणार…
भवानी पेठ येथील कार्यक्रमाच्या ठिकाणावरून येण्यास उशीर झाल्याने आमची भेट झाली नाही. पण रासने माझे सहकारी मित्र असून आम्ही दोघांनी महापालिकेमध्ये एकत्रित काम केले आहे. त्यामुळे आता निवडणुका संपल्या आहेत. मी सामाजिक कामात कुठे ही राजकारण आणणार नाही. राजकारणाचं युद्ध संपलय आता समाजकारणाचं युद्ध सुरू झालं आहे. त्यामुळे एकत्र हातात हात घालून काम करू असे त्यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Politics News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुण्यातील कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता ??
Sharad Pawar : गळ्यात कांद्याच्या माळा घालणारे भाजपवाले कुठे गेले ?? शरद पवारांचा सवाल