पुणे : पुण्यातील आळंदी येथे एका तरुणाने पिस्तुलाचा धाक दाखवत नागरिकांना ‘मी इथला भाई आहे. मला हप्ते द्या’ अशी धमकी देऊन दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वयंघोषित भाईवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ओंकार नवनाथ भोसले (वय १८, रा. चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई सोमवारी १९ फेब्रुवारीला रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास केली. ओंकार नवनाथ भोसले (वय १८, रा. चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार भोसले हा गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ आळंदीतील नगर परिषद शाळा क्रमांक चारच्या परिसरात येऊन त्याच्या जवळच्या बेकायदा पिस्टलने नागरिकांना धमकावत असे. ‘मी इथला भाई आहे. मला हप्ता द्यायचा,’ असे म्हणून नागरिकांमध्ये दहशत पसरवली. अखेर पोलिसांनी ओंकार भोसले याला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.