Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातून अजब घटना समोर आली आहे. एकाने तरुणाच्या कानाचा चावा घेत कानाची पाळी तोडली आहे. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. घरावर दगड का मारला याचा जाब विचारला असता हा प्रकार घडला आहे. पिंपळे गुरव येथील मोरया पार्क गल्ली येथे शनिवारी (दि.17) रात्री हा प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपळे गुरव, मोरया पार्क येथील घटना
याप्रकऱणी अभिजीत उमाकांत शिंदे (वय 19, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pimpri News ) त्यावरून नामदेव दशरथ साळुंखे (रा. पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण यांनी आरोपीला तू आमच्या घरावर दगड का मारला असे विचारले याचा राग येवून आरोपीने त्यास शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.(Pimpri News) तसेच तक्रारदाराच्या उजव्या कानाला चावून कानाची पाळी तोडली. यात तक्रारदार अभिजीत जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : दारु पिऊन पत्नीला केली मारहाण; पत्नीच्या माहेरी घातला गोंधळ
Pimpri News : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; २२ दुचाकी जप्त