Pimpri News : पिंपरी, (पुणे) : इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेली दोन मुले नदीच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीतील मोशी परिसरात हि घटना घडली आहे. बुडालेले दोघेही अद्याप सापडले नसल्याने त्यांना शोधण्याचे काम अद्यापही सुरू आहे
मोशी परिसरातील घटना
शक्तिमान कुमार (वय – २०) सोनू कुमार बैठा (वय २०) असे बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेने बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
शनिवारी दुपारी शक्तिमान कुमार व सोनू कुमार हे दोघे जण इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. (Pimpri News) घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली. इंद्रायणी नदीमध्ये बुडालेल्या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
इंद्रायणी नदीमधून मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा केल्याने या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाला अडथळे निर्माण होत आहेत. (Pimpri News) त्यामुळे अद्यापही या बुडालेल्यांचा शोध लागलेला नाही. घटनास्थळावर अग्निशमन दल व एनडीआरएफ टीमकडून शोध कार्य सुरू आहे.
दरम्यान, मुले ज्यावेळी पोहायला आली त्यावेळी तेथील काही जणांनी त्यांना पोहण्यासाठी जाऊ नका, असे सांगितले होते. मात्र त्यांनी ऐकले नाही. (Pimpri News) आणि काही वेळानंतर ही मुले दिसेनाशी झाल्यानंतर संबधित नागरिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : कस्टम विभागाने कुरिअर पकडल्याचे सांगत महिलेला ३६ लाखांना गंडा; एकाला अटक
Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये ५१ जणांना डेंग्यूची लागण; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली!
Pimpri News : पिंपळे सौदागर परिसरात १५ गाड्या फोडणाऱ्या गुंडांची सांगवी पोलिसांनी काढली धिंड..