Pimpri News : पिंपरी : महापालिकेच्या हद्दीलगतच्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. मात्र, येथे मुलभूत सुविधांचा अभाव आहे. यामुळेच विकासापासून वंचित राहिलेल्या हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. याबाबत बारणे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर तत्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ही गावे लवकरच महापालिकेत येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
खासदार बारणे यांनी दिली माहिती
खासदार बारणे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याबाबतचे निवेदन दिले. मुळशी, मावळ तालुक्यात असलेली ही गावे महापालिकेच्या अगदी जवळ आहेत. (Pimpri News) येथे मुलभूत सुविधांचा अभाव आहे. आयटीनगरी असलेल्या हिंजवडीचा विकास होणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा देणे शक्य होत नाही. सुविधांसाठी नागरिकांनी गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी केली आहे, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या सात गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा ठराव २०१५ मध्ये महापालिका सभेत झाला आहे. गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुरेसे नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. (Pimpri News) त्यामुळे पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे. गावांचा विकास, नागरिकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात आणि अनधिकृत बांधकामे रोखण्याच्या दृष्टिने या सात गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : मावळात गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई
Pimpri News : मॉल, बंद दुकानांवर दरोड्याचा कोयता गॅंगचा प्रयत्न फसला; चौघांना अटक, एक फरार