गणेश नारंग
Pimpri News : पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला असून आज शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळच्या सुमारास वायसीएम रुग्णालयाच्या कचराकुंडीत एक अर्भक आढळून आले आहे. (The infant was found in the garbage dump of YCM Hospital of Pimpri Chinchwad Municipal Corporation)
अर्भक हे स्त्री जातीचे असून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून एक महिला हॉस्पिटलच्या पाठीमागच्या गेटने हॉस्पिटल परिसरात आली तिने ते अर्भक कचराकुंडीत टाकले व तिथून पळून गेली असे सांगण्यात येत आहे. (Pimpri News )
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिलाही वायसीएम रुग्णालयात उपचार घेत नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. (Pimpri News ) अर्भक हे काही दिवसाचे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ केली जात आहे.
रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या असलेल्या वायसीएम रुग्णालयाची सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. असे कोणीही येऊन अर्भक कचराकुंडीत टाकून जात आहे. (Pimpri News ) यावर वेळीच वायसीएम रुग्णालयाच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : वाकड पोलिसांनी सराईत घरफ़ोड्याला ठोकल्या बेड्या
Pimpri News : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील कर्मचा-याची आत्महत्या
Pimpri News : 12वीच्या परिक्षेत अपयश आल्याने विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या