Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News | ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा प्रयोग होऊ देणार नाही अशी भूमिका म्हणजे पोलीसांच्या गौरवशाली परंपरेला गालबोट…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 May 2023, 9:57

Pimpri News | पिंपरी – फ्री पासेस दिले नाहीत तर प्रयोग कसा होतो ते पाहतो अशा प्रकारची पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी खेदजनक असून अशा प्रवृत्तींना आपला तीव्र विरोध आहे, असं सांगत तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांना मानाचा मुजरा करीत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी असे आवाहन केले.

गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी येथील एच. ए. मैदानावर ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास नव्या पिढीपर्यंत आणि समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण राज्यभर या महानाट्याचे प्रयोग करीत आहोत. यापूर्वी झालेल्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, कराड या ठिकाणी झालेल्या महानाट्याच्या प्रयोगाला पोलिसांनी चांगले सहकार्य केले. परंतु आज पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी पासेससाठी केलेला प्रकार खेदजनक आहे असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

आजच्या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. कोल्हे यांनी व्यासपीठावर येऊन झालेल्या प्रकाराची नापसंती व्यक्त करताना प्रयोगासाठी तिकीट काढून आलेल्या प्रत्येकाचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर याच जनतेच्या करांच्या पैशातून आपला पगार होतो आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहायला फ्री पास मागता अन् तो दिला नाही तर नाटक कसं होतं ते पाहतो अशी धमकी देता? पोलिसांच्या २६/११ च्या वेळी, कोविड काळात जीवाची बाजी लावली त्या पोलीसांच्या उज्ज्वल परपंरेला मिळवलेल्या लौकिकास अशा क्षुल्लक गोष्टींसाठी गालबोट लावू नका अशी कळकळीची विनंतीही केली.

पोलिसांनी केलेल्या सहकार्याचा दाखला देताना डॉ. कोल्हे यांनी नाशिकमधील पोलीस आयुक्तांनी २५०० पोलीसांना तिकीट काढून ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य दाखवले याचा आवर्जून उल्लेख केला. त्याचबरोबर फ्री पासेससाठी गोंधळ घालणाऱ्या पोलीसांचे नाव घेणार नाही, कारण विरोध व्यक्तीला नसून फ्री पासेसची मागणी करण्याच्या प्रवृत्तीला विरोध असल्याचे त्यांनी सांगून डॉ. कोल्हे यांनी फ्री पासेस दिले नाही तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सादर करु दिला जाणार नाही अशी धमकी देणाऱ्या पोलीसांना कडक समज द्यावी अशी मागणी केली.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी रेल्वे स्टेशन परिसरात रंगला रम्मीचा अड्डा; पोलिसांच्या धाडीत 4 जण रंगेहात जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 15:49

नसरापूरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये भयंकर प्रकार! ६५ वर्षांचा नराधम आणि ४ अन् १० वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणी; दोघींना तोंड दाबून उचलून न्यायचा अन् आळीपाळीने…

Tuesday, 28 July 2026, 15:35

शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा जाळ्यात! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून अटक,SITचा मोठा प्रहार

Tuesday, 28 July 2026, 15:34

“दादांना जाऊन ६ महिने झाले, आम्ही संयमाने वाट पहिली आता मात्र”; युगेंद्र पवार आक्रमक

Tuesday, 28 July 2026, 15:05

शेजाऱ्यासोबत जुळले सूत, गोड बोलून त्याने कारमध्ये बसवले अन् माजी सरपंच महिलेची केली हत्या; कोल्हापूर हत्याकांडाचा उलगडा

Tuesday, 28 July 2026, 14:56

‘बापाच्या जीवावर उडतो का?’ पुण्यात विद्यार्थ्यासोबत घडलं भयंकर; किरकोळ कारणावरून पाठलाग करत मारहाण…

Tuesday, 28 July 2026, 14:31
Next Post

Kishor Aware Murder Case | किशोर आवारे हत्याकांडात मोठा ट्विस्ट ; वडिलांना मारल्याच्या रागातून केली हत्या, माजी नगसेवकाचा मुलगा खुनाचा खरा सूत्रधार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.