Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड परिसरात चोरी तसेच दरोड्याच्या गुन्हयांमध्ये वाढ होत आहे. दरोडा विरोधी पथकाने नुकतीच कारवाई करत, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून १२ लाख ११ हजार रुपयांचे १८ तोळे सोन्याचे दागिने, एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
१८ तोळ्यांचे दागिने, पिस्तुल जप्त
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण गुरुनाथ राठोड, अर्जुन कलप्पा सूर्यवंशी आणि संतोष जयहिंद गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pimpri News) यातील मुख्य आरोपी किरण रघुनाथ राठोड याला दिघी परिसरातून अटक केली आहे. पोलीस तपासात याने गेल्या आठ ते दहा महिन्यांमध्ये अनेक चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी त्यांचा साथीदार अर्जुन कलप्पा सूर्यवंशी आणि संतोष जय हिंद गुप्ता या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. (Pimpri News) या वेळी आरोपींनी घरफोडीचे पाच गुन्हे केल्याचे कबूल केले असून, एक दरोड्याचा गुन्हादेखील केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अमरीश देशमुख, भारत गोसावी यांच्यासह (Pimpri News) पोलीस कर्मचारी राजेश कौशल्ये, सुमित देवकर, गणेश सावंत, विनोद वीर, आशिष बनकर, गणेश शिंदे, कोकणे, पुलगम, रासकर, कदम, खांडे, लोखंडे, शेडगे, खारगे, सुपे, रौगे यांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
Pimpri News : कस्टम विभागाने कुरिअर पकडल्याचे सांगत महिलेला ३६ लाखांना गंडा; एकाला अटक