Pimpri News : पिंपरी-चिंचवड : कारच्या मागे असणाऱ्या दुचाकीस्वाराने हॉर्न जोरात वाजवल्याच्या कारणातून टोळक्याने एकाच्या कानशिलात भडकावल्याचा प्रकार समोर आला आहे. मावळातील ओझर्डे गावात हा प्रकार गुरुवारी (22) रोजी घडला आहे.
शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याप्रकरणी अक्षय कुंडलीक पारकी (वय 27 रा. ओझर्डे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून, दत्तात्रय ओझरकर, रामदास ओझरकर, लक्ष्मण ओझरकर, भानूदास ओझरकर, तानाजी ओझरकर, अर्जून ओझरकर, शंकर ओझरकर (सर्व रा. ओझर्डे, मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी आरोपीच्या कारच्या मागे जोराने हॉर्न वाजवला, याच्या रागातून आरोपींनी भांडण सुरु केले. यावरून आरोपींनी इतरांना सोबत बोलावून फिर्यादीच्या दुकानात काठ्या घेऊन आले असता फिर्यादी लपले. (Pimpri News) यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांच्या कानाखाली मारले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : वर्क फ्रॉम होमच्या बहाण्यातून महिलेची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक
Pimpri News : टेलिग्रामवरील बनावट खात्यावरून तब्बल साडेसहा लाखांना घातला गंडा
Pimpri News : पिंपरी-चिंचवड : भरधाव कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा मृत्यू..