Pimpri News : पिंपरी : दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना मोस्ट वाँटेड असलेल्या विकी मल टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यावर १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आठ महिन्यांत ३० टोळ्यांवर कारवाई
दरम्यान, मागील आठ महिन्यांत ३० संघटित टोळ्यांतील २४८ गुन्हेगारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. टोळी प्रमुख विकी रामप्रसाद मल (वय ४२, रा. थेरगाव), प्रसाद रोहीदास भापकर (वय २४, रा. रहाटणी), प्रतीक अंतवण पवार (रा. थेरगाव) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
वाकड तसेच पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, पळवून नेणे, डांबून ठेवणे, खंडणी, वाहनांची तोडफोड, (Pimpri News) जाळपोळ करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा करणे असे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी आरोपी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : जिद्दीला सलाम! दिव्यांग असतानाही वैष्णवीने मिळवले विशेष यश
Pimpri News : मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा मावळ, लोणावळ्यात निषेध