Pimpri News : प्रदीप गांधलीकर / पिंपरी : बालाजी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, ताथवडे यांनी आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात जे. एस. पी. एम. ब्लॉसम पब्लिक स्कूलने बाजी मारली.
या प्रदर्शनात एकूण १५ शाळांतील १८४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यांत जे. एस. पी. एम. ब्लॉसम पब्लिक स्कूल ताथवडे येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला; तसेच इतर अभिनव प्रयोग सादर करून सगळ्यांची वाहवा मिळविली.इयत्ता दहावीच्या शाश्वत मिश्रा, सिद्ध फेगडे, प्रत्यूष गुमास्ते या विद्यार्थ्यांनी ‘टाइल्सच्या दाबाने वीज निर्मिती’ या संकल्पनेवर आधारित विज्ञानाचा एक अभिनव प्रयोग सादर केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे (शास्त्रज्ञ- एफ. डी. आर. डी. ओ. पुणे) आलोक कन्हाई यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचा चषक आणि रोख रुपये आठ हजार असे पारितोषिक देण्यात आले. तसेच शाळेतर्फे सादर करण्यात आलेल्या इतर प्रकल्पांचेही त्यांनी कौतुक केले. विज्ञान शिक्षिका पल्लवी जाधव यांनी मुलांना मार्गदर्शन केले. शाळेच्या प्राचार्या स्वाती आरू तसेच उपप्राचार्या दीपा पवार यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.