Pimpri News ; पिंपरी-चिंचवड : शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. काल जाचाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा अशीच एक घटना भोसरीतून समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. भोसरीतील महात्मा फुले नगरात मंगळवारी दि.13 रोजी ही घटना घडली आहे.
भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याप्रकरणी विवाहितेचा भाऊ विशाल आजिनाथ टेकाळे (वय 28, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pimpri News) त्यावरून स्वप्नील माणिक मगर, माणिक मगर, मनोहर शिंदे, दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या बहिणीचे आरोपी स्वप्नील याच्याशी डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले. त्यानंतर सासरच्या लोकांनी तक्रारदार यांच्या बहिणीला शिवीगाळ, मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्यांच्याकडे पैसे आणि वस्तूंच्या स्वरुपात हुंड्याची मागणी केली. (Pimpri News) या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांच्या बहिणीने सासरी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : चिखलीत नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; दोघांना अटक
Pimpri News : रहाटणी येथे छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या