Pimpri News : पिंपरी-चिंचवड : ‘मी झाडावर बसलो आहे, मला न्यायला या’ म्हणत एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड मधील थेरगाव येथे घडला आहे. हा तरून काम शोधण्यास जातो, असे सांगून घराबाहेर पडला व त्याने त्याच्या आईला फोन केला व नंतर गळफास घेतला. हा प्रकार सोमवारी (दि. 19) सकाळी थेरगाव येथे घडला.
थेरगाव येथील घटना
प्रमोद राजेंद्र कुशवाह (वय 19, रा. जय भवानी कॉलनी, सोळा नंबर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याला लग्न करायचे होते. मात्र तुमचे लग्नाचे वय झालेले नाही, असे सांगत त्या दोघांची कुटुंबीयांनी समजूत घातली होती. (Pimpri News) यामुळे मागील दोन दिवसांपासून प्रमोद अवस्थ होता. सोमवारी सकाळी तो काम शोधण्यास जातो, असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने आईला फोन केला. ‘मी आत्महत्या करण्यासाठी बिर्ला हॉस्पिटल जवळील नदी किनारी झाडावर बसलो आहे, मला न्यायला या’असे सांगितले. घरातील व्यक्तींनी त्याचा चिंचवडमधील नदी किनारी शोध घेतला असता थेरगाव घाटाजवळ प्रमोद गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला.त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : दारु पिऊन पत्नीला केली मारहाण; पत्नीच्या माहेरी घातला गोंधळ