Pimpri News : पिंपरी-चिंचवड : 65 वर्षीय पादचारी जेष्ठाला रिक्षाने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा घटना रविवारी (दि.25) निगडीतील दुर्गामाता मंदिराजवळ रात्री घडली. रिक्षा भरधाव वेगात असल्यामुळे हा अपघात घडला आहे. दरम्यान शहरात रिक्षा चालकांच्या बेदरकारपणामुळे शहरात अपघातांच्या प्रमाण वाढले आहे.
निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
बन्सी किसन भुबाळ (वय 65) असे मृत्यू पावलेल्या नागरिकाचे नाव आहे. (Pimpri News) याप्रकरणी नितीन बन्सी भुबाळ (वय 35 रा.निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडील बन्सी भुबाळ हे दुर्गामाता मंदिराजवळून पायी जात होते. यावेळी आरोपी हा त्याच्या ताब्यातील रिक्षा वेगात घेऊन आला, व त्याने बेदरकारपणे भुबाळ यांना जोरात धडक दिली. (Pimpri News) यावेळी तेथे न थांबता तेथून पळून गेला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भुबाळ यांचा मृत्यू झाला. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : प्रेमविवाह केलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या कुटुंबियांना केली मारहाण
Pimpri News : पत्नी, मेहुणीला मारहाण करणार्यावर पतीसह त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा
Pimpri News : पिंपरीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट लावला उधळून