Pimpri News : पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे दूर्घटना घडली. विसर्जन सुरू असताना चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
परिसरात हळहळ
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अर्णव आशिष पाटील (वय ४, रा. मंत्रा सोसायटी, मोशी) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मोशी याठिकाणी काल सायंकाळी ही दूर्दैवी घटना घडली. अर्णव पाटील हा मोशीतील मंत्रा सोसायटीमध्ये राहण्यास आहे. (Pimpri News) या सोसायटीत गणपती बसवण्यात आला होता. गणपतीचे विसर्जन गुरुवारी सायंकाळी झाले. हा सोहळा पाहण्यासाठी अर्णव आई-वडिलांसह सहभागी झाला होता. पाण्याच्या टाकीच्या बाजूच्या कठड्यावर उभा असतानाच अचानक तोल जाऊन तो पाण्याच्या टाकीत पडला. सोसायटीतील सदस्य लेझीमच्या तालावर नाचत असतानाच अर्णव टाकीत पडला. मिरवणुकीत सर्वजण दंग असल्याने ही बाब कोणाच्याच लक्षात आली नाही.
दरम्यान, आई-वडीलांनी त्याचा शोध घेतला असता, तो सापडला नाही. काही वेळाने वडीलांना टाकीचे झाकण उघडे असल्याचे दिसले. टाकीमध्ये डोकावले असता, अर्णव तेथे दिसला. तातडने त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, तो सापडेपर्यंत फार उशीर झाला होता. (Pimpri News) उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विसर्जनादरम्यान अर्णव आणि त्याच्या आईने एक सेल्फी घेतला होता. हा सेल्फी शेवटचा ठरला. या घटनेमुळे अर्णवच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : चिंचवडमध्ये एसटी बस दुभाजकाला धडकून अपघात; जिवीतहानी टळली
Pimpri News : प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज फाडला; हिंजवडी ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल