पिंपरी : पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर येत आहे. बौद्ध नगरमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. घरगुती गॅसचा स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले असून होरपळलेल्या पाचही रुग्णांना आधी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. गॅस स्फोटानंतर आग न लागल्यानं स्थानिकांनी याबाबत अग्निशमन दलाला याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. हा स्फोट नेमका कशामुळं झाला आहे, यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे.
मनोज कुमार वय 19, धीरज कुमार वय 23, गोविंद राम वय 28, राम चेलाराम वय 40, सत्येंदर राम वय 30 ही गॅस स्फोटमध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत. हा भीषण स्फोट गॅस पाईप लिक झाल्यामुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारांसाठी वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, नंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.