Pimpri-Chinchwad News पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील रहाटणी परिसरातील मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. (Pimpri-Chinchwad News) आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोन पीडित मुलींची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे. (Pimpri-Chinchwad News) हि कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.15) रहाटणी शिवार चौकात केली आहे. (Pimpri-Chinchwad News)
वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रोहन विलास समुद्रे (वय ३४, रा. ४७३ / २६६९ संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे) यांच्यासह एका महिलेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरातील शिवार चौक येथील रेनबो प्लाझामधील APPLE SPA शॉप नं. ५०७, पाचवा मजल्यावर वेश्याव्यवसाय सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रहाटणी येथे स्पाच्या नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या मुलींना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीसांनी अचानक धाड टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. यावेळी दोन पीडित महिलांचा सुटका करण्यात आली. तर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रोहन समुद्रे यांच्या एक महिलेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा करण्यात आला आहे.
हि कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.