पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 6 जणांचा मृत्यू तर, 8 जखमी आणि 5 जण गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. इतर जखमी कामगारांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र भीषण आगीत कारखाना जळून खाक झाला आहे. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल, असे म्हटले आहे तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार म्हणाले की, केकवरील फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
या घटनेची सखोल चौकशी करा : सुप्रिया सुळे
करताना म्हटले की, पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे फटाक्यांच्या गोदामाला आग लागून मोठी जीवितहानी झाली आहे. या घटनेत काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मयत व्यक्तींच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या पुढे म्हणाल्या, हे गोदाम अनधिकृत असल्याचे समजत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत शासनाने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे, असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
पिंपरी-चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी दुपारी तीनच्या सुमारास फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यावेळी आग कारखान्यात 25 कामगार काम करत होते. आग लागताच काहींनी बचावासाठी पळ काढला, परंतु या आगीत काहीजण अडकल्याने 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 8 जण जखमी आणि 5 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. इतर जखमी कामगारांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व कामगार हे केकवरील फायर कँडल बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते. या भीषण आगीत कारखाना जळून खाक झाला असून मोठं नुकसान झालं आहे.