पिंपरी चिंचवड : बनावट फेसबुक खाते तयार करून एका 58 वर्षीय नागरिकाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना काळेवाडी येथून समोर आली आहे. महेंद्र धिवरे असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र धिवरे ( रा. काळेवाडी ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्याशिवाय 8249989484 या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. हा फसवणूकीचा प्रकार बुधवार (दि.14) रोजी काळेवाडी येथे घडल्याचे धिवरे यांनी सांगितले आहे. यात त्यांची 94 हजार 500 रुपयांची फसवणूक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र धिवरे यांच्या मित्राच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे धिवरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन केला. मित्राला धिवरे यांना घराचे सामान विकायचे आहे असे सांगून सामान पाठवण्यासाठी म्हणून धिवरे व त्यांच्या मुलाने आरोपीला 94 हजार 500 रुपये पाठवले. मात्र चौकशी अंती हे बानवट खाते असल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.