(Pimpri Chinchwad Crime ) पिंपरी : पैशाच्या आर्थिक व्यवहारातून व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंड बाळा वाघेरे याला राहत्या घरातून चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती
याप्रकरणी एका २९ वर्षीय व्यापाऱ्याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर बाळा वाघेरे, राहुल उणेचा आणि हरीश चौधरी (रा.वाल्हेकरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि हरीश चौधरी यांच्यात पैशांची देवाण-घेवाण झाली होती. फिर्यादीने हरीश चौधरी याच्याकडून घेतलेली सगळी रक्कम परत केली होती. त्यानंतर देखील तो त्यांना पैसे मागत होता. बाळा वाघेरे आणि त्याच्या साथीदारांनी आपआपसात ठरवून फिर्यादीचे अपहरण केले आणि त्याला बाळा वाघेरेच्या घरी नेले. त्याच्याकडे खंडणी मागण्यात आली होती. फिर्यादीने त्यास नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली.
दरम्यान, फिर्यादीने पैसे देण्याचे कबूल केले आणि थेट चिंचवड पोलिस ठाणे गाठले. आणि बाळा वाघेरे, राहुल उणेचा आणि हरीश चौधरी (रा.वाल्हेकरवाडी) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी धडक कारवाई करत बाळा वाघेरेला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Manjari Crime : मांजरी येथील झोमॅटो डिलव्हरी बॉयचा हांडेवाडी चौकात अपघाती मृत्यू!
Pune Crime : डिलर शिपमध्ये पार्टनरशिप देतो म्हणून फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!