पिंपरी-चिंचवड :Pimpri Chinchwad Crime News : पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे स्पा सेंटरच्या नावाखाली (under the name of spa center) वेश्या व्यवसाय (Prostitution business ) करणाऱ्यावर पोलीसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत एकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. स्पा सेंटर (spa center) चालकाने स्पा च्या नावाखाली महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय (Prostitution business) करून घेतल्याचा प्रकार कारवाईत समोर आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी शिवार चौक, पिंपळे सौदागर येथील ‘योग द स्पा’या ठिकाणी करण्यात आली.
(Pimpri Chinchwad Crime News)
निवृत्ती प्रकाश पाटील (वय 26, रा. शिवार चौक, पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या स्पा सेंटर चालक मालकाचे नाव असून त्यास वाकड पोलीसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिलांनाआरोपी निवृत्ती पाटील हा स्पा सेंटरच्या नावाखाली पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्याने उपजीविका भागवली. दरम्यान स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली त्यानंतर पोलीसांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.