पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातुन दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सुरु असलेल्या तपासात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक दोन पथकाने चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. शंकर भरत देवकुळे असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील मेट्रो स्टेशन परिसरात गाड्यांचे हॅन्डल लॉक न लावता पार्क केलेल्या वाहनांची शंकर देवकुळे हा बनावट चावी लावून वाहन चोरी करत होता. चोरी केलेली वाहन पैसे मिळवण्यासाठी कमी शिक्षित असलेल्या लोकांना अल्प दरात विक्री करत होता. याबाबत पोलीस तपासात सर्व माहिती उघडकीस आली आहे.
७० वाहन चोरीचे गुन्हे वेगवेगळ्या राज्यातील गुन्हे..
दरम्यान शंकर देवकुळे या चोरट्याच्या ताब्यातून पोलिसांनी १३ दुचाकी वाहन आणि दोन ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत. शंकर देवकुळे याच्यावर जवळपास ७० वाहन चोरीचे गुन्हे वेगवेगळ्या राज्यातील गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.