Pimpari News पिंपरी, (पुणे) : शिवजयंतीच्या दिवशी १० मार्चला पिंपरी चिंचवडमध्ये शिवभक्तांच्या गाडीला अपघात होऊन ३० ते ३५ जण जखमी झाले होते. या जखमींमधला तेरा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. छातीला आणि मेंदूला जबर मार लागल्याने मृत्यूशी चाललेली झुंज अखेर गुरुवारी अपयशी ठरली.
आर्यन कोंडभर (वय-१३, रा. शिलाटने, ता. मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या शिवभक्ताचे नाव आहे. त्याच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अत्यंत शोकाकुल परिस्थीतीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तळवडे जवळ शिवभक्तांच्या गाडीला ट्रकने दिली होती मागून धडक…
मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंतीच्या दिवशी १० मार्च रोजी मल्हार गडावरून मावळात शिवज्योत घेऊन हे शिवभक्त परतत होते. त्यावेळी पिंपरी चिंचवड येथील तळवडे जवळ आल्यावर या शिवभक्तांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली होती. त्या धडकेत ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले होते. या काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले होते.
आर्यन कोंडभर हा या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या छातीला आणि मेंदूला जबर मार लागल्याने त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. आर्यनला उपचारासाठी ओझस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेल्या ५ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
दरम्यान, आर्यन हा सर्वांशी मिळून मिसळून राहणारा मुलगा होता. एवढ्या कमी वयात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याला प्रचंड आकर्षण होते. मात्र त्याची उपचारादरम्यान मृत्यूशी चाललेली झुंज अपयशी ठरली ती सर्वांना चटका लावून जाणारी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Breaking News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आजपासून दौंड-सोलापूर नवीन डेमो सुरु
Shikrapur Crime | शिक्रापूर येथील शरद बँकेच्या एटीएम मशीनमधून ९० हजारांची रोकड चोरी
Breaking News | मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात ; तिघांचा जागेवरच मृत्यू..!