Pimpari News | पुणे : जगप्रसिद्ध सिम्पोलो सिरॅमिक्सची मागणी पाहता पिंपरी-चिंचवड म्हणजेच पुण्यातील चामुंडा स्टोन्समध्ये सिम्पोलोची श्रेणी ग्राहकांना मिळण्याच्या उद्देशाने सिम्पोलो व्हिट्रिफाइड फ्रँचायझी मॉडेल सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भरत अघारी यांनी दिली.
सिम्पोलो सिरॅमिक्सचे नवीन दालन जगताप डेअरी, वाकड, पिंपरी-चिंचवड येथील श्री चामुंडा स्टोन्समध्ये सुरु करण्यात आले असून याचे उद्घाटन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भरत अघारा यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी श्री चामुंडा स्टोन्स स्टोअरचे चेअरमन राकेश जैन, ललित जैन, मुकेश जैन, तुषार जैन, सिम्पोलो सिरॅमिक्सचे महाराष्ट्र प्रमुख राजेश राजन सोबत विविध क्षेत्रातील मान्यवर, आर्किटेक, बांधकाम व्यवसायिक उपस्थित होते.
अघार म्हणाले की, ”कंपनीचे देशभरात 1100 पेक्षा जास्त डीलर्स आहेत आणि श्री चामुंडा स्टोन्सचे 108 वे सिम्पोलो दालन आहे. पुणे शहरातील वाढती मागणी पाहता हे दालन सुरु केले आहे. सिम्पोलो 50 पेक्षा अधिक देशात एक्सपोर्ट करित आहे. सिम्पोलो सिरॅमिक्स ही एक आघाडीची भारतीय टाइल उत्पादक कंपनी आहे जी विविध ऍप्लिकेशन्ससाठी सिरेमिक आणि विट्रिफाइड टाइल्सची विस्तृत श्रेणी तयार करते.”
श्री चामुंडा स्टोन्सचे चेअरमन राकेश जैन म्हणाले की, ”चामुंडा स्टोन्सचे स्टोअर 2004 साली 5000 स्क्वेअर फुट मध्ये सुरु केले होते ते आता एक लाख स्क्वेअर फुटावर पोहचले आहे. चामुंडा स्टोन्स मध्ये लॉयली, एशियन सारख्या बॅ्रंडचे 16/20 मिमी जाडीच्या आउटडोअर टाइल्स, किचन प्लॅटफॉर्म, डबल चार्ज व्हिट्रिफाइडचे उत्पादने उपलब्ध आहेत, त्यात आता सिम्पोलो सिरॅमिक्सचेही उत्पादने येथे ग्राहकांना मिळणार आहेत.”
इटालियन मार्बल, ग्रेनाईट टाईल्स, सीपी सॅन्टेरीवेअर आदी प्रकार उपलब्ध आहेत. स्वप्नातील घरात लिव्हींग रुम, बेडरुम, बाथरूम सोबत आऊटडोर साठीही विविध प्रकारचे टाइल्स उपलब्ध आहेत. श्री चामुंडा स्टोन्स स्टोअर सोबत आमचे होम एप्लायंन्सचेही स्टोर आहे. येथे सर्वप्रकारचे नावाजलेल्या कंपनीचे इलेक्ट्रीकल उपकरणे उपलब्ध आहेत. असेही त्यांनी सांगितले.