पुणे, ता. 25 : पूर्व वैमनस्यातून टोळक्याने एकावर लॉखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना पिंपरी परिसरात 14 जानेवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. या घटनेतील एका आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती अॅड.गणेश माने यांनी दिले आहे.

विक्रांत साधू जाधव असे जमीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर या हल्ल्यात सोनू रमेश मलकेकर (भाटनगर बसस्टॉप पिंपरी, पुणे) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मलकेकर यांच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार 7 ते 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. आरोपी विक्रांत जाधव याने अॅड.गणेश माने यांच्यावतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या खटल्यात अॅड.गणेश माने यांनी गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींचे नाव व पत्ते पोलिसांकडे आहेत, ओळखपरेड घेणे बाकी आहे. म्हणून जामीन नाकारता येणार नाही. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झालेला असून दोषारोपपत्र दाखल होण्यास बराच अवधी बाकी आहे.

दरम्यान, अॅड.गणेश माने यांनी यांनी इतर अनेक न्यायिक मुद्द्यांवर सर्वोच्च-उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचे दाखले देऊन आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला. हे युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस विविध अटी शर्तींसह तीस हजार रुपयांच्या जातमूचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या खटल्यात अॅड.माने यांना अॅड.विजय कुंभार, अॅड.धनंजय गलांडे, अॅड.उमेश मांजरे व ओंकार गरड यांची बहुमुल्य मदत मिळाली.







