Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निगडीपर्यंत मेट्रो विस्ताराचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारची मान्यता ; भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मानले आभार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 23 October 2023, 21:26

पिंपरी, ता.२३ :  पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सक्षम करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो विस्ताराला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील नागरिकांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.

पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने सोमवारी २३ ऑक्टोबर मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते दापोडी हा ७.९ किलोमीटरचा मार्ग १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाला होता. तर, पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग ६ मार्च २०२२ पासून सुरू झाला आहे. या मार्गाच्या कामासोबत पिंपरी ते निगडी या ४.१३ किलोमीटर अंतराच्या मार्गाचे काम सुरू करावे, अशी शहरातील नागरिकांनी लावून धरली होती.

दरम्यान, राज्य सरकारने निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाला मान्यता दिली. केंद्र सरकारकडे दोन वर्षांपासून प्रस्ताव रखडला होता. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाचे उपसचिव सुनील कुमार यांनी निगडीपर्यंत मेट्रोला मान्यता दिल्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

साडेबारा किलोमीटर मेट्रो प्रवास सुविधा…
पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गावर चिंचवड स्टेशन येथील पिंपरी पोलीस ठाणे, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक असे तीन स्टेशन आहेत. हा मार्ग ४.१३ किलोमीटर लांबीचा असून तो उन्नत (एलिव्हेटेड कॉरिडॉर) मार्ग असणार आहे. खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. त्यामुळे निगडी ते दापोडी या मुख्य मार्गावर १२.५० किलोमीटर अंतराची मेट्रो प्रवासी सेवा उपलब्ध होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था सक्षम करणे काळाची गरज आहे. स्वारगेट ते पिंपरी आणि पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो हा पिंपरी-चिंचवड व पुणे शहराचा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक पुढाकार घेतला. राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे त्याला फायदा झाला. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात या प्रकल्पाला खो बसला होता. पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल शहरवासीयांच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचे आभार व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Film News : 'टायगर 3' मधील 'लेके प्रभू का नाम' रिलीज होताच सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊसच..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.