पिंपरी : देहूरोड येथे मुख्य बाजारात विक्रीसाठी घरात साठवलेला ११ लाख ४८ हजार ३४१ रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देहूरोड येथे मुख्य बाजारात मंगळवारी २३ जानेवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अन्न सुरक्षा प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड यांनी बुधवारी २४ जानेवारीला दिलेल्या फिर्यादीवरून देहूरोड पोलिसांनी रियाज अजीज शेख (४५, रा. मेन बाजार, देहूरोड) याला अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, रियाज याने विक्रीसाठी प्रतिबंधित पानमसाला साठवला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार अन्नसुरक्षा प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ११ लाख ४८ हजार ३४१ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल भंडारे करत आहेत.