पिंपरी : चिंचवड येथे कुत्र्यावरून एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. गाडीवर श्वान लघुशंका करत असताना गाडी मालकाने श्वान मालकाला विचारणा केली असता मालकाने शिवीगाळ करुन श्वानाच्या गळ्यातील लोखंडी चैनीच्या हुकाच्या पट्ट्याने मारहाण करुन जखमी केले. ही घटना गुरूवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजता चिंचवड येथील इगल हॉटेल समोर घडली.
याप्रकरणी अतुल गुलाब लोंढे (वय ३६, रा. डांगेचौक रोड, वाकड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धनंजय कालीदास यादव व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल लोंढे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास इगल हॉटेलसमोर पिकअपची वाट पाहात गाडीत बसले असताना त्याठिकाणी एक कुत्रे आले. त्यावेळी एका कुत्र्याने फिर्यादी यांच्या गाडीवर लघुशंका केली. फिर्यादी यांनी गाडीतुन खाली उतरून आरोपीला याबाबत कुत्र्याच्या मालकाला विचारणा केली.
त्याचा राग येऊन कुत्र्याच्या मालकाने शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील कुत्र्याच्या गळ्यातील लोखंडी चैनच्या हुकाने फिर्यादीच्या डोक्यात मारत जखमी केले. तसेच संशयित महिला आरोपीनेही फिर्यादी यांना शिवीगाळ करुन धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.