NHAI News पिंपरी : पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निमित्ती करण्यात येत आहे. (NHAI News) आठ पदरी प्रशस्त महामार्ग होणार असून, आगामी ५० वर्षांतील वाढत्या वाहतुकीचा विचार करुन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करा. (NHAI News) मेट्रो आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा ताण येणार नाही, याची काळजी घ्या, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. (NHAI News)
आमदार महेश लांडगे यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या सूचना
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणारा पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी, कासारवाडी, मोशी परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि भविष्यकालीन नियोजनाबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेमार्फत सादरीकरण (Presentation) करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशीपर्यंत प्रशस्त आठ पदरी रस्ता होणार आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंना २ लेन सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे ४/६ लेनमध्ये सुधारणा करणे आणि सिंगल पिलरवर टायर-१ येथे ८ लेन ‘एलिव्हेटेड फ्लायओव्हर’चे बांधकाम प्रस्तावित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावरील नाशिक फाटा ते खेड दरम्यान २९.८१ किमी अंतरावरील ‘एलिव्हेटेड कॅरिडॉर’चे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ८ पदरी रस्ता, मेट्रो लाईन (डबल डेकर), सर्व्हीस रोड, रॅम्प याचा समावेश आहे.
सध्यस्थितीला मोशी या ठिकाणी प्रतिदिन ९६ हजाराहून अधिक वाहनांची, तर खेडमध्ये ६७ हजाराहून अधिक वाहनांची प्रतिदिन रहदारीची नोंद आहे. भविष्यातील वाढत्या रहदारीचा विचार करुन प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोशीतून तब्बल ६ लाख ७० हजाराहून अधिक वाहनांची प्रतिदिन रहदारी सुलभपणे होवू शकते. खेडचा विचार केला असता प्रतिदिन ३ लाख ९७ हजाराहून अधिक वाहनांची रहदारी प्रतिदिन होईल, अशी क्षमता पुणे-नाशिक ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची राहील, असा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
स्थानिक प्रवाशांसाठी ‘रोड रॅम्प’ सुविधा…
पुणे-नाशिक महामार्गाच्या ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’चे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यावरून येणाऱ्या गाड्या विना अडथळा चाकणच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नाशिक फाट्यापासून मोशीपर्यंत जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसाठी काही ठिकाणी ‘रोड रॅम्प डाऊन’ करून जाण्याची सुविधा असेल. त्याचपद्धतीने मोशीपासून नाशिक फाट्यापर्यत येणाऱ्यासाठी अशाच सुविधा असतील. तसेच, पुणे विमानतळावरून चाकणकडे जाण्यासाठी मार्गिका राहणार आहे.
‘व्हीजन-२०२०’ अंतर्गत पुणे-नाशिक महामार्गाच्या विकासाचा संकल्प आम्ही केला होता. कोविड आणि लॉकडाउन आणि राज्यातील सत्ताबदलामुळे मध्यंतरी प्रकल्पाचे काम संथ होते. मात्र, आता राज्यात भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे हा प्रकल्प निश्चितपणे निर्धारित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो. आज झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना आगामी ५० वर्षांचा विचार करुन नियोजन करावे आणि तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना केली आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur Lok Sabha News : शिरूर लोकसभेत अमोल कोल्हे विरुद्ध महेश लांडगे यांच्यात लढत?
Pimpri News : भोसरी मतदार संघात शासकीय योजनांची ‘जत्रा’: आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार