पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारांची टोळी तयार करुन धुडगुस घालणाऱ्या राहुल यादव आणि त्याच्या चार साथीदारांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील चार संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 24 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख राहुल प्रल्हाद यादव (वय 32, रां. कुदळवाडी, चिखली), नागेश गुलचंद सूर्यवंशी (वय 28, रा. सोळू, ता. खेड), रोहन भानुदास यादव (वय 21, रा. रामदास नगर, चिखली), आशिष भीमराव बजलव (वय 27, रा. कुदळवाडी, चिखली), राजेश बहरीच निसाद (वय 32, रा. कुदळवाडी, चिखली) अशी मोक्का कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अधिक कि, टोळी प्रमुख राहुल यादव याने स्वत:चे वर्चस्व आणि दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांची टोळी तयार केली होती. या टोळीने चिखली, आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा, मारामारी, बेकायदेशीर जिवघेणी हत्यारे जवळ बाळगणे अशा गंभीर गुन्हांची नोंद आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक पोलीस निरीक्षक निता उबाळे, पीसीबी गुन्हे शाखा सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जगदाळे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, महिला पोलीस हवालदार केदार यांच्या पथकाने केली आहे.