-संगीता कांबळे
पिंपरी : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मनविसे निगडी प्राधिकरण विभागाच्या वतीने सेक्टर 25 येथील संत तुकाराम उद्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनविसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, मनविसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनिकेत प्रभू, मनविसे उपशहराध्यक्ष प्रतीक शिंदे, सचिव अक्षय नाळे, शरण्य पाटणे, उपविभाग अध्यक्ष प्रज्योत पुजारी, रुद्र बैरागी, अजित देवकर, जगदीश लांडगे, कुणाल कदम, आयुष चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित मदने यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन मनविसे उपशहराध्यक्ष ओंकार पाटोळे यांनी केले.