Mahesh Landge | पिंपरी : नाशिक औद्योगिक वसाहातीमधील सातपूर येथील इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट इंडिया प्रा. लि. च्या कामगारांना तब्बल १६ हजार रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे.
नाशिक औद्योगिक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ…
आमदार महेश लांडगे यांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात यशस्वी मध्यस्थी केली. विशेष म्हणजे, नाशिक, सातपूर औद्योगिक क्षेत्रातील ही सर्वाधिक वेतनवाढ ठरली आहे.
इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट इंडिया प्रा. लि. आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये हॉटेल कलासागर, कासारवाडी, नाशिकफाटा येथे झालेल्या पहिला वेतनवाढ करार झाला. यावेळी आमदार महेश लांडगे, संघटनेचे प्रमुख सल्लागार, रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे व कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील कोपरकर यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे.
यावेळी सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, प्रशांतआप्पा पाडेकर, महादेव येळवंडे, रविंद्र भालेराव, दत्तात्रय गवारे, दत्ता येळवंडे, कुणाल कोळेकर, युनिट प्रतिनिधी विष्णू रासकर, बाबुराव पोते, हेमंत हिरे, दत्तात्रय कांदळकर, शुभम एरंडे, कमलेश पाटील, प्रमोद लोहार, जगन लांडगे, एच. आर. डायरेक्ट इंडिया हेड दिपाली खैरनार, प्लॅन्ट हेड. दिप्तीरंजन नायक, डी. जी.एम, एच आर अनिकेत निळेकर, रिजनल मॅनेजर आय. आर अनिल कुंभार, एच. आर. असि. मॅनेजर श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.
वेतनवाढ करारानुसार, कामगारांना एकूण १६ हजार रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. पगाराचा रेशो पहिल्या वर्षी ७० टक्के, दुसऱ्या वर्षी १५ टक्के आणि तिसऱ्या वर्षी १५ टक्के असा मिळणार आहे. कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस ३ लाख रुपये या प्रमाणे चार व्यक्तींसाठी १२ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी राहणार संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, आणि मुले यांचा समावेश करण्यात येणार आहे.
यासह मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, टर्म इन्शुरन्स पॉलीसी, दिवाळी बोनस, मासिक हजेरी बक्षीस, वार्षिक स्नेहसंमेलन, प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ५ महिन्याचा फरक एप्रिल महिन्याच्या पगारामध्ये देण्यात येणार आहेत.
४० कंत्राटी कामगार कायम सेवेत…
वेतनवाढ करारानुसार कंपनीतील कंत्राटी कामगारांना कंपनी रोलवर घेऊन कायम नोकरी देण्याचे ठरले आहे. तसेच, उर्वरीत कामगारांना पुढील करारामध्ये कायम करण्याचे अस्वासन व्यवस्थापनाने दिले आहे. या करारानुसार कामगारांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामगारानी डिजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
H3N2 virus : शहरात H3N2 चा पहिला बळी; आमदार लांडगे अधिवेशनातून माघारी