Lonikand News : लोणीकंद, (पुणे) : गुरू पौर्णिमेचे औचित्य साधत इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचे भाषण ऐकून लोणीकंद पोलिसांनी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यास शालेय साहित्य व आर्थिक मदतीचा हात दिला आहे. Lonikand News
विष्णुजी शेकोजी सातव विद्यालयातील अंजित खंडागळे या सातव विद्यालयात एका कार्यक्रमानिमित्त पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व रितेश काळे उपस्थित होते. यावेळी अंजित याने भाषण केले. त्याचे भाषण ऐकून कोळपे व काळे हे दोघेही प्रभावित झाले. त्यांनी प्राचार्य अजिनाथ ओगले यांच्याकडे या विद्यार्थ्याबाबत चौकशी केली असता तो गरीब कुटुंबातील व हुशार असल्याचे ओगले यांनी सांगितले. Lonikand News
त्याला मदत करण्याचा निर्धार या दोघांनी केला होता. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याला बोलावून त्याला शालेय साहित्य व आर्थिक मदत केली.
दरम्यान, या प्रसंगी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाक, मारुती पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरू, सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, कुणाल सरडे, सायबर क्राईमचे उपनिरीक्षक सुरेश गोरे, महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.