चिंचवड : चिंचवडमध्ये दि. 08 फेब्रुवारी 2020 रोजी विवाहीत महिलेनं नवरा, सासू आणि सासरे यांच्या त्रासाला कंटाळून पाचव्या मजल्यावर असलेल्या आपल्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा न्यायाधीश पी पी जाधव, शिवाजीनगर, पुणे सेशन कोर्टाने निकाल दिला असून, न्यायालयाने आरोपी पती संतोष नामदेव पाटील आणि सासू सुजाता नामदेव पाटील यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 498A, 3048 आणि 306 नुसार दंडनीय गुन्ह्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 235(2) द्वारे दोषी ठरवून त्यांना दहा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आली आहे. दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
दि. 08 फेब्रुवारी 2020 रोजी आपल्या मेघा पाटील या विहित महिलेनं सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून पाचव्या मजल्यावर असलेल्या घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. मेघा पाटील या महिलेला नवरा, सासू आणि सासरा यांनी किरकोळ कारणावरुन वारंवार घालुन पाडुन बोलुन मानसिक व शारीरीक त्रास देवुन, फ्लॅट घेण्यासाठी आईवडीलांकडून 25 लाख रुपयाची मागणी करुन तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते.
त्यांच्या त्रासाला कंटाळून 5 व्या मजल्यावर असणा-या घराच्या गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या केली होती. त्या संदर्भात सुधाकर शंकर शिंदे,(मृत मेघा या महिलेचे वडिल) यांनी चिंचवड पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे तक्रार दाखल केली होती. तपास अंमलदार म्हणून रोहिणी शेवाळे यांनी काम पहिले तर सरकारी वकील म्हणून नामदेव तरळगटटी यांनी काम सांभाळले.