पुणे : कसबा येथील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी दावा ठोकला होता. मात्र, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जागताप यांनी नाव न घेता अशी चर्चा सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करताना, रुपाली पाटील यांनी कसबा मतदारसंघावर केलेला दावा मोडून काढला आहे.
कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन होणे हा पुण्यातील राजकीय वर्तुळाला धक्का असल्याचे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. अजून त्याचा दशक्रिया विधी होण्यासाठी अवधी असताना देखील विविध राजकीय पक्षाकडून कसब्याच्या जागेची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील या संदर्भात कोणतीही चर्चा करण्याची आवश्यकता नाही, असे प्रशांत जगताप म्हणाले.
ही पुण्याची संस्कृती नाही. पुण्याने नेहमीच राज्याला, देशाला नवीन दिशा दिली आहे. मुक्ता टिळक यांचे निधन आमच्यासाठी देखील धक्का असून त्यानिमिताने सुरु झालेली चर्चा थांबायला हवी, असे आवाहन देखील प्रशांत जगताप यांनी केले.
निवडणूक लागल्यानंतर अशी चर्चा करणे योग्य असले तरी अजून दशक्रिया विधी देखील झाला नसून अशी चर्चा रंगत असेल तर पुणेकर म्हणून लाज वाटण्यासारखे आहे, अशा शब्दात प्रशांत जगताप यांनी कार्यकर्तायना फटकारले.
राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी ‘पक्षाने आदेश दिला, तर कसबा मतदारसंघाची निवडणूक लढवू शकते’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
मात्र, आज राष्ट्रवादीची शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज त्यांचे नाव न घेता अशा प्रकारच्या चर्चा सहन करणार नसल्याचे सांगितले.