Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

त्याला डॉक्टर बनायचं होतं पण पुण्यात येऊन गुन्हेगारीचा मार्ग निवडला! झटपट श्रीमंतीच्या नादात उच्चशिक्षित तरुणाचा कारनामा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 August 2026, 15:25

पिंपरी: झटपट आणि मोठा पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी तरुणांकडून गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातही अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ६६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अविनाश बाकलीकर हा BAMSच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी अविनाश ज्ञानोबा बाकलीकर (वय २८, रा. लातूर) आणि तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४, रा. मरकळगाव) यांना अटक केली आहे. ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित बँक खात्यांचा तपास सुरू केला. या तपासात तेजस लोखंडे याचे नाव समोर आले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या बँक खात्यात पाच लाख रुपये आढळून आले.

हिंजवडीतील गुन्ह्याप्रकरणी लोखंडे येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना त्याची अविनाश बाकलीकरशी ओळख झाली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर दोघांनी संपर्क कायम ठेवला. बाकलीकरने इतर आरोपींशीही संपर्क वाढवला होता. त्याने संबंधितांचे मोबाईल क्रमांक ‘युनिव्हर्सिटी’ या नावाने सेव्ह केल्याचे तपासात समोर आले आहे.

यानंतर दोघांनी मिळून सायबर गुन्ह्यांमध्ये वापरण्यासाठी बोगस बँक खाती उपलब्ध करून देण्याचे जाळे उभारल्याचा पोलिसांचा संशय आहे. लोखंडेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लातूर येथून अविनाश बाकलीकरला अटक केली.

 

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा वळवण्यासाठी बाकलीकरने ‘सस्टेनब्लॉक कन्स्ट्रक्शन’ आणि ‘स्टुनोव्हा’ या नावांनी बोगस कार्यालये सुरू केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही सायबर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

या टोळीने अशाच प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09
Next Post

पुण्यात रातोरात 40 टन ऊस गायब; साखर महागली अन् चोरांनी शोधली चोरीची नवी शक्कल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp