Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात रातोरात 40 टन ऊस गायब; साखर महागली अन् चोरांनी शोधली चोरीची नवी शक्कल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 August 2026, 15:44

पुणे : सणासुदीच्या दिवसांत साखरेचे भाव वाढल्याची चर्चा सुरू असतानाच, पुण्यातून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. एरवी मौल्यवान वस्तू किंवा वाहनांची चोरी झाल्याचे समोर येते मात्र आता हवेली तालुक्यातील आष्टापूर येथे चोरट्यांनी थेट शेतातील उभा ऊस कापून नेल्याचा अजब प्रकार घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टापूर येथील शेतकरी अनिल नंदकुमार कामठे यांची गट क्रमांक 822 मध्ये शेती आहे. कामठे कुटुंब 19 ते 23 ऑगस्टदरम्यान कामानिमित्त मुंढव्याला गेले होते. शेतात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या शेतावर डल्ला मारला. कामठे कुटुंबीय परत आल्यावर त्यांना शेतातील सात महिन्यांचा वाढलेला ऊस गायब झाल्याचे दिसले. पाहणी केली असता, सुमारे 88,000 रुपये किमतीचा तब्बल 40 टन ऊस चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांनी 24 ऑगस्ट रोजी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी नवनाथ लक्ष्मण कोतवाल (वय 29) याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, योगेश पोपट गव्हाणे (वय 25, दोघे रा. आष्टापूर) याने आपल्या कामगारांच्या मदतीने हा ऊस तोडून लंपास केल्याचे उघड झाले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस वाहून नेण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर करण्यात आला, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, साखरेचे दर वाढल्यामुळे चोरट्यांनी थेट शेतातून ऊसच पळवल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09
Next Post

सोशल मीडियावर 'डॉन'गिरी भोवली! लाईक्स अन् फॉलोवरसाठी तरुणाला रील बनवणं पडलं महागात; बारामती पोलिसांचा 'रील'स्टारला दणका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp