पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दतील 15 मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी ते चाकण जाणार्या रोडवरील केळगाव बायपास ब्रीज, चाकण ब्रीज, नगर परिषद ब्रीजवर पाणी आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग : पुण्याकडून येणारी वाहतूक देहूफाटा चौक येथून डावीकडे वळून मोशी मार्गे इच्छित स्थळी जाता येईल. चर्होली फाटा येथून उजवीकडे वळून पीसीएस चौक, मरकळ चौक, चाकण चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. चाकणकडून येणारी वाहतूक चाकण चौक, मरकळ चौक, पीसीएस चौक येथून उजवीकडे वळून चर्होली मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरकळ ते शिक्रापूर जाणार्या रोडवरील मरकळ ब्रीज वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहतूक मरकळगाव येथून डावीकडे वळून कोयाळी कमानीपासून उजवीकडे वळून शेल पिंपळेगाव येथे डावीकडे वळून रसिका हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव तळे ओसंडून वाहू लागल्याने तळेगाव गावठाणाकडून सोमाटणे गावाकडे जाणरा रस्ता बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : लिंब फाटा, तळेगाव खिंड, सोमाटणे फाटा येथून वाहनांना जाता येईल.
तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंदमाता अंडरपासमध्ये पाणी भरल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : काका हलवाई चौक, स्टेशन चौक मार्गे वाहनांना जाता येईल.
महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फलके येथील ओढ्यातील पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चक्रेश्वर रोड ते भूजबळ आळी रस्ता वाहतुकीस बंद आहे. हा रस्ता अंतर्गत असल्याने इतर अंतर्गत रस्त्याने वाहनांना जाता येईल. मोईगाव येथील इंद्रायणी नदी पुलावर पाणी आल्याने माई फाटा ते डायमंड चौक हा रस्ता वाहतुकीस बुधवारी सायंकाळपासून बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : डायमंड चौक, भारतमाता चौक येथून डावीकडे वळून मोशी टोल नाका, मोई फाटा मार्गे मोई गावात जाता येईल.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताथवडे अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी सव्हिस रोडचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तळेगाव तळे ओव्हर फ्लो झाल्याने आकार फाउंड्री कंपनीकडून तळेगाव गावाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहन चालकांनी सोमाटणे लिंब फाटा मार्गे जावे.
बिर्ला हॉस्पिटल ते रिव्हर ह्यू चौक या दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : बिर्ला चौक येथून उजवीकडे वळून बारणे कॉर्नर, तापकीर चौक मार्गे वाहनांना इच्छित स्थळी जाता येईल.
समीर लॉन्स येथील अंडरपासमध्ये सात फूट पाणी साचल्याने हा मार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई बेंगलोर महामार्गावरून वाहनांना जाता येईल.
काळेवाडी कडून हेडगेवार ब्रीजकडून चिंचवड गावाकडे येणारी वाहतूक चितराव गणपती येथे बंद करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग : पिंपरीगाव मार्गे भाटनगर, लिंक रोडने चिंचवडगाव येथे जाता येईल.
मोरया गोसावी मंदिराकडून स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग नाही. खराळवाडी ग्रेड सेपरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पुणे मुंबई जाणारा ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : सव्हिस रोडने पिंपरी पूल मार्गे वाहनांना जाता येईल. तसेच मोरवाडी चौकातून डावीकडे वळून अजमेरा, नेहरूनगर, वल्लभनगर, नाशिकफाटा मार्गे पुण्याकडे जाता येईल.
भोसरी एमआयडीसी मधील पांजरपोळ क्लाऊड नाईन हटिल येथे रस्त्यावर पाणी आल्याने पांजरपोळ चौकाकडून भोसरीकडे येणारी वाहतूक अवजड वाहने सोडून इतर वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. भोसरी ते पांजरापोळ चौक सर्व वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहने स्पाईन रोड व इंद्रायणीनगर मार्गे जातील