Fraud News | पिंपरी-चिंचवड : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुक करणे एकास चांगलेच महागात पडले आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत चोरट्याने एकाची तब्बल पाच लाख 18 हजारांची फसवणूक झाल्याची घटने समोर आली आहे. हा प्रकार 7 मार्च 2022 13 एप्रिल 2023 या कालावधीत कासरवाडी परिसरात घडला.
दरम्यान फसवणूक झाल्याप्रकरणी कुणाल रामदास सुतार (वय 39, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून एका अनोळकी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये चांगला फायदा होईल असे अनोळखी व्यक्तीने सुतार यांना आमिष दाखविले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगत तक्रारदार सुतार यांचा सुरुवातीला विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.
आमिषाला बळी पडत सुतार यांनी ते ॲप्लिकेशन डाऊनलोड आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. त्यानंतर त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुतार यांनी तब्बल पाच लाख 18 हजार रुपये गुंतवणूक केली. मात्र, त्यांना कोणताही परतावा अधवा गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही.
दरम्यान सुतार यांच्या आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले असल्याचे त्यांनी फिर्यादी मध्ये म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.