Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी गरोदर पत्नीची गळा चिरून हत्या केली नंतर स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार करत इमारतीवरून उडी मारली; हत्येचं धक्कादायक कारण समोर….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 21 September 2026, 21:04

पिंपरी-चिंचवड : पुण्यातील देहूगाव परिसरात जमिनीच्या खरेदीवरून झालेल्या वादातून पतीने आपल्या तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीची धारदार हत्याराने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपी पतीने स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने आधी स्वतःच्या अंगावर ब्लेडने वार केले आणि त्यानंतर राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुभांगी आकाश बारसकर (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आकाश रामदास बारसकर (वय 31) असे आरोपी पतीचे नाव आहे. आकाश हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाघा गावचा रहिवासी असून पुण्यातील हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे.

पोलीस आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 20 सप्टेंबरच्या पहाटे 4.30 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास देहूगाव येथील रामचंद्र यदु राऊत यांच्या भाड्याच्या खोलीत घडली. आकाश आणि शुभांगी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून जमिनीच्या खरेदीवरून वाद सुरू होता. सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी आकाशने आपल्या मूळ गावी शेतीची जमीन खरेदी केली होती. मात्र शुभांगीचा या निर्णयाला विरोध होता. गावात जमीन घेण्याऐवजी पुण्यात घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करावी, अशी तिची इच्छा होती. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात आले.

शुभांगी तीन महिन्यांची गर्भवती असतानाही या विषयावरून दोघांमध्ये वाद होत होते. घटनेच्या दिवशी पहाटेही याच कारणावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. या वादातून आकाशने धारदार हत्याराने शुभांगीच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आकाशने स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने आधी ब्लेडने स्वतःच्या अंगावर वार केले. त्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून शरीराच्या इतर भागांनाही दुखापत झाली आहे. इमारतीखाली तो जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शुभांगीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच गंभीर जखमी आकाशला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शुभांगीचे वडील सतीश मारुती काईत (वय 56) यांनी दिलेल्या तक्रारीवरून देहूरोड पोलिसांनी आकाश बारसकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यार जप्त करण्यात आले आहे. आरोपीची प्रकृती सुधारल्यानंतर त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे देहूगाव आणि हिंजवडी परिसरात खळबळ उडाली असून तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुमचा कुत्रा का भुंकला?’ म्हणत पुण्यात २ बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारहाण; दगड अन् सळईने हल्ला करत केले जखमी

Monday, 21 September 2026, 23:01

पुण्यात गणेश विसर्जनाबाबत मोठा निर्णय! तब्बल १५० मंडळांना मुख्य मिरवणुकीत ‘नो एन्ट्री’

Monday, 21 September 2026, 22:08

कदमवाकवस्तीत पहाटेपर्यंत रंगला ‘होम मिनिस्टर’चा जल्लोष! महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध खेळ, मनोरंजन अन् आकर्षक बक्षिसांनी कार्यक्रमाची रंगत वाढली

Monday, 21 September 2026, 21:27

आधी गरोदर पत्नीची गळा चिरून हत्या केली नंतर स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार करत इमारतीवरून उडी मारली; हत्येचं धक्कादायक कारण समोर….

Monday, 21 September 2026, 21:04

‘माझ्या बहिणीची छेड काढतो का?’ जाब विचारायला गेला, डोकं सटकलं अन् हत्याराने गुप्त भागावर वार करत तरुणाचा खून

Monday, 21 September 2026, 20:01

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; न्यायालयात ‘चेन ऑफ कस्टडी’वर युक्तिवाद पूर्ण

Monday, 21 September 2026, 19:57
Next Post

कदमवाकवस्तीत पहाटेपर्यंत रंगला ‘होम मिनिस्टर’चा जल्लोष! महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध खेळ, मनोरंजन अन् आकर्षक बक्षिसांनी कार्यक्रमाची रंगत वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp