चिंचवड : चिंचवड पोलिस ठाण्यातुन मोठी बातमी समोर येत आहे. चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश बांगर यांना संलग्न करण्यात आले आहे. या बादल्यांमागे वेगवेगळी कारणे सांगण्यात येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांचा दप्तरी (रायटर) अमोल जाधव याला अटक केली होती. या कारवाईला जबाबदार धरून ढमाळ यांची बदली केली असल्याचे बोलले जात आहे. तसेच, चिंचवड आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर झालेल्या कारवाईमुळे अंकुश बांगर आणि जितेंद्र कोळी यांना संलग्न केल्याची माहिती मिळत आहे. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.