पिंपरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव व्यापक स्वरुपात व्हावा अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे आमदार अमित गोरखे यांनी केली. पिंपरी चिंचवड महापालिका दर वर्षी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव साजरा करीत असते. त्या पाश्वभूमीवर आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेतली. तसेच शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेतली. यावेळी शहरातील नागरिकांचे, झोपडपट्टीतील विविध प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन अमित गोरखे यांनी आयुक्तांशी चर्चा केली,
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दरवर्षी 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या दरम्यान “प्रबोधन विचार पर्व” च्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव साजरा केला जातो. या जयंती उत्सवा मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्रातील थोर विचारवंत, कलावंत, यांच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची आदान प्रदान केली जाते. या कार्यक्रमाला महापालिकेकडून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीतील अध्यक्ष व समिती सदस्यांना सोबत घेऊन आयुक्तांची यासंदर्भात चर्चा केली असता आयुक्तांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.