Dehu News : देहू : पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी आणि अलंकापूरी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज देहूत तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. सध्याचे राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीवरचे होत असल्याचे सांगत, याबद्दल खेद व्यक्त केला. समाजकारण हाच मुख्य हेतू ठेवून राजकारण करण्याची सुबुद्धी सर्वांना मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी तुकोबाचरणी केली. तसेच लवकरात लवकर पाऊस होऊन बळीराजा सुखी व्हावा, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली.(Rohit Pawar Tukobacharani)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान शनिवारी पंढरपूरच्या दिशेने झालं आहे. इनामदार वाड्यात मुक्कामी असलेली तुकोबांची पालखी आज पुन्हा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. (Dehu News) तुकोबांच्या पालखीचे आमदार रोहित पवार यांनी दर्शन घेतलं. या वेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केले. रोहित पवार म्हणाले की, तुकोबांच दर्शन घेत असताना दोन-तीन गोष्टी मनात होत्या. एक तर महाराष्ट्राचे कल्याण होवो. लवकरात लवकर पाऊस होऊन बळीराजा सुखी व्हावा. ही प्रार्थना मी तुकोबा चरणी केली आहे.
खालच्या दर्जाच्या राजकारणावर केले भाष्य
सध्या सुरू असलेल्या अत्यंत खालच्या दर्जाच्या राजकारणावर त्यांनी भाष्य केले. कोणत्याही राजकारण्याकडून व्यक्तिगत हिताचे राजकारण केले जाते तेव्हा सामान्य नागरिकांना अडचणी येतात. (Dehu News) ही पद्धत लवकरात लवकर समूळ नष्ट व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे रोहित पवार म्हणाले. समाजकारण मुख्य स्थानी ठेवून राजकारण करावे, अशी सुबुद्धी सर्वांना द्यावी अशी प्रार्थना मी संत तुकारामचरणी केली, असंही ते म्हणाले.
सुप्रिया सुळे यांच्या नव्या जबाबदारीबद्दल विचारले असता, रोहित पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांचा दिल्लीत चांगला संपर्क आहे. गेली १५ वर्षे त्यांना दिल्लीतील कामाचा अनुभव आहे. (Dehu News) विविध पक्षातील खासदारांची ओळख आणि मैत्री आहे. संवादकौशल्य आहे. त्यांच्यातील या गुणांचा पक्षाला निश्चितच फायदा होऊ शकतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Dehu News : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारकरी हरिनामात दंग
Dehu News : देहूमध्ये वारीच्या तयारीला वेग; वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक कामे घेतली हाती
Dehu News| देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे ; उमेश मोरेंचा केला नऊ मतांनी पराभव…!